news
clock
पाण्याचे संवर्धन ही  शहरातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे -  मुख्य अभियंता संजय कुलकर्णी

पाण्याचे संवर्धन ही शहरातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे - मुख्य अभियंता संजय कुलकर्णी

पाण्याचे संवर्धन ही  शहरातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे -  मुख्य अभियंता संजय कुलकर्णी

जागतिक जलदिनामित्त नागरीकांनी घेतली जलसंवर्धनाची प्रतिज्ञा, पवना नदीकाठावर स्वच्छता मोहिम

पिंपरी, ता. २३ - ''आजच्या वाढत्या शहरीकरण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे संवर्धन ही केवळ गरज नाही, तर ही शहरातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी बनली आहे. नदी, नाले आणि जलस्रोत स्वच्छ ठेवणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पुढील पिढ्यांसाठी पाणी जतन करणे आवश्यक आहे. '' असा संदेश  महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिला.

जागतिक जलदिनानिमित्त रविवारी (ता. २२) महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभाग व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने रावेत येथे पवना नदीकाठावर नागरीकांनी 'पाण्याची बचत व संवर्धन करण्याची' प्रतिज्ञा घेतली. नदीकाठी स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. तरुणाई या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला जागतिक जलदिनाचे महत्त्व सांगितले. पाण्याचे संवर्धन, जलस्रोतांचे वाढते प्रदूषण तसेच नदी, नाले आणि पाणवठ्यांच्या स्वच्छतेची गरज याबाबत करण्यात आले. त्यानंतर नदीकाठ व परिसरात स्वच्छता मोहीम करण्यात आली.

उपस्थित सर्वांनी पाण्याची बचत व संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली. पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट, सोहन निकम, उपअभियंता पंकज फेंडे, प्रिती गाडे तसेच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश बरीदे, उपअभियंता प्रवीण धुमाळ दोन्ही विभागांचे कनिष्ठ अभियंते उपस्थित होते. 

''अशा जनजागृती उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येतो आणि पर्यावरण संरक्षणाला बळकटी मिळते.'', असे संजय कुलकर्णी यांनी सांगितले. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories