news
clock
नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पुढाकारातून पिंपरीत वैद्यकीय मदत कक्ष सुरु,  गरजू रुग्णांना मोफत उपचार

नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पुढाकारातून पिंपरीत वैद्यकीय मदत कक्ष सुरु, गरजू रुग्णांना मोफत उपचार

नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पुढाकारातून पिंपरीत वैद्यकीय मदत कक्ष सुरु,  गरजू रुग्णांना मोफत उपचार

पिंपरी, ता. 8 - गरीब व गरजू रुग्णांसाठी  नगरसेवक संदीपभाऊ बाळकृष्ण वाघेरे यांच्या पुढाकारातून पिंपरी गावातील तपोवन मंदिर रोड येथील जनसंपर्क कार्यालयात “संदीपभाऊ वाघेरे वैद्यकीय मदत कक्ष” सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांना विविध आजारांवर मोफत मार्गदर्शन व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध होणार आहे.

या मदत कक्षामार्फत न्यूरो सर्जरी (मेंदू शस्त्रक्रिया), ऑर्थोपेडिक (हाडांच्या शस्त्रक्रिया), जनरल सर्जरी, हृदयरोग उपचार, किडनी विकार, कॅन्सर उपचार (केमोथेरपी, रेडिएशन), प्लास्टिक सर्जरी, बालरोग शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, किडनी स्टोन ऑपरेशन, प्रोस्टेट सर्जरी तसेच अपघातग्रस्तांसाठी उपचार अशा विविध वैद्यकीय सेवांचा समावेश आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक असून केसरी/पिवळे रेशन कार्ड, आधार कार्ड, संबंधित हॉस्पिटलचे कोटेशन आणि फोटो सादर करणे आवश्यक आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना संदीप वाघेरे यांनी सांगितले की, “गरजू रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळावेत, हा आमचा उद्देश आहे. या मदत कक्षाच्या माध्यमातून अनेकांना दिलासा मिळेल.”

अधिक माहितीसाठी अमित कुदळे (मो. ९६७३४९४१४९) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच नागरिकांनी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून गरजू रुग्णांना या सुविधेचा लाभ मिळवून द्यावा,‌ असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories