news
clock
महामॅरेथॉनसाठी उद्या सांगवी परिसरातील वाहतूकीत बदल

महामॅरेथॉनसाठी उद्या सांगवी परिसरातील वाहतूकीत बदल

महामॅरेथॉनसाठी उद्या सांगवी परिसरातील वाहतूकीत बदल

पिंपरी, ता. २१ - लोकमत माध्यम समूहातर्फे रविवारी (ता. २२) पुण्यात महामॅरेथॉन आयोजित केले आहे. ही दौड पहाटे ५ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापासून सुरु होईल. पुढे, पुणे शहर हद्दीतून राजीव गांधी पुलामार्गे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणार आहे व पुढे ही दौड काळेवाडी फाटा-संतोष नगर- डांगे चौक येथील संतोष कार्यालयाजवळ यु-टर्न घेवून बीआरटीमार्गे परत जाणार  आहे. त्यामुळे, स्पर्धेच्या मार्गावरील सांगवी फाटा ते राजीव गांधी ब्रिजकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत, त्याबाबतचे आदेश पिपंरी-चिंचवड  वाहतुक शाखेचे पोलीस उप-आयुक्त विवेक पाटील यांनी दिले आहे. 

सांगवी वाहतुक विभागांतर्गत सांगवी फाटा येथून राजीव गांधी ब्रिजकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहतूकीस मनाई करण्यात येत आहे. वाहने ढोरे पाटील अंडरपास मार्गे डी मार्ट (महादजी शिंदे रोड) मार्गे इच्छीत स्थळी जातील. वाहतूकीतील हे बदल २२ फेब्रुवारीला पहाटे ५ ते १० या वेळेत लागू असतील. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मात्र हा बदल लागू नसेल. नागरीकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories