राज्यातील महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात एप्रिलपासून बदल

पुणे, ता. १८ - मध्य रेल्वेने परिचालन कारणास्तव मुंबई-अमरावती, मुंबई-नागपूर दुरांतोसह राज्यातील महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. येत्या एप्रिल महिन्यापासून टप्याटप्प्याने हे बदल लागू होणार असल्याने मध्य रेल्वेने कळविले आहे. त्यामुळे या रेल्वेगाड्यांच्या सुटण्याच्या आणि गंतव्यस्थळी पोहोचण्याच्या वेळेतही बदल होणार आहे.

अशा आहेत  बदललेल्या वेळा - 

- सीएसएमटी-अमरावती एक्स्प्रेस (१२१११) (सध्याची वेळ) रात्री ८.०५ वा., (नवी वेळ) रात्री ८.५० वा.

- सीएसएमटी-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस (१२२८९) - (सध्याची वेळ) रात्री ७.५५ वा., (नवी वेळ) रात्री ८.३५ वा.  सुटेल.

- नागपूर-सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेस (१२२९०) - (सध्याची वेळ) सकाळी ८.०५ वा., (नवी वेळ) सकाळी  ७.५० वा.

- दादर-हुबळी एक्स्प्रेस (१७३१८) - (सध्याची वेळ) रात्री ८.१५ वा., (नवी वेळ) ८.०५ वा.

- सीएसएमटी-बंगळूर एक्स्प्रेस (११३०१) (सध्याची वेळ) सकाळी ८.१० वा., (नवी वेळ) सकाळी ७.५५ वा.

- लातूर-सीएसएमटी एक्स्प्रेस (२२१०८)- (सध्याची वेळ) सकाळी ८.०० वा.च (नवी वेळ) सकाळी ७.५५ वा.

- सोलापूर-सीएसएमटी एक्स्प्रेस (१२११६) - (सध्याची वेळ) सकाळी ६.३० वा., (नवी वेळ) सकाळी ६.३५ वा.

- बिदर-सीएसएमटी (२२१४४) (सध्याची वेळ) सकाळी ८.०० वा.च (नवी वेळ) सकाळी ७.५५ वा.

सीएसएमटी - वाराणसी महानगरी एक्सप्रेसचे वेळापत्रक -

- सीएसएमटी - बनारस महानगरी एक्सप्रेस ट्रेन क्रमांक २२१७७ सीएसएमटीहून रात्री १२.१५ वा. प्रस्थान करेल आणि बनारस येथे ०३.४५ वा. पोहोचेल (पूर्वी वाराणसी येथे ३.३५ वा.).

- बनारस - सीएसएमटी महानगरी एक्सप्रेस ट्रेन क्रमांक २२१७८ बनारस येथून ९.४५ वा. प्रस्थान करेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ११.४० वा. पोहोचेल.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance