भोसरीत अडीच वर्षांच्या मुलाला दुचाकीची धडक; चार महिन्यांनी गुन्हा दाखल

भोसरीत अडीच वर्षांच्या मुलाला दुचाकीची धडक; चार महिन्यांनी गुन्हा दाखल

भोसरी | २५ नोव्हेंबर २०२६ : सोसायटीच्या आवारात दुपारी खेळत असलेल्या एका चिमुकल्याला दुचाकीची धडक बसली. त्यात मुलगा गंभीर जखमी झाला. जुलैमध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी सुमारे चार महिन्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दिघी रोडवरील आदर्शनगर परिसरातील एका गृहनिर्माण सोसायटीत २७ जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अडीच वर्षांचा मुलगा सोसायटीच्या आवारात खेळत होता. त्याच वेळी एका दुचाकीचालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून मुलाला धडक दिल्याचे त्याच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. या धडकेत मुलाच्या डाव्या मांडीला गंभीर दुखापत झाली.

मुलाच्या आईच्या तक्रारीवरून भोसरी पोलिसांनी २४ नोव्हेंबर रोजी रात्री आकाश मधुकर कांबळे (वय १९ वर्षे) या दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५(अ) व १२५(ब), तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि ११९/१७७ नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस हवालदार माने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories