उर्से येथे बेकायदेशीर दारू साठा जप्त, एकावर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. २८ - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने उर्से (ता. मावळ, जि. पुणे) येथे कारवाई करून बेकायदेशीर दारुचा साठा जप्त केला असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या ताब्यातून एकूण १ लाख ४३ हजार ३६० रुपये किमतीच्या ‘पॉवर लाईम पंच’ नावाच्या देशी दारुच्या १८० व ९० मिलीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवाी (ता. २७) दुपारी २.२० वाजताच्या सुमारास समारास हायवे बार हॉटेलच्या शेजारी, बिर्ला सिमेंट दुकानाच्या मागील शेडमध्ये ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी आरोपी अमर बाबुराव वरकट (वय ४०, रा. उर्से, ता. मावळ, जि. पुणे) हा बेकायदेशीररित्या देशी दारु साठवून विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
छाप्यामध्ये आरोपीच्या ताब्यातून एकूण १ लाख ४३ हजार ३६० रुपये किमतीच्या ‘पॉवर लाईम पंच’ नावाच्या देशी दारूच्या १८० व ९० मिलीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरोपीकडे दारू विक्रीसाठी कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीला समजपत्र दिले आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत शिरगाव परांदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा शुक्रवारी (ता. २७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.