news
clock
विजया एकादशीनिमित्त आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिराची मनोहारी सजावट

विजया एकादशीनिमित्त आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिराची मनोहारी सजावट

  विजया एकादशीनिमित्त आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिराची मनोहारी सजावट 

पिंपरी, ता. २७ - विजया एकादशीनिमित्त आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिराला विविध प्रकारच्या फुलांची मनोहारी सजावट करण्यात आली आहे. फुलांमध्ये सजेलेले माऊलींचे रुप भाविकांनी डोळ्यांत साठवून घेतले.  

शुक्रवारी (ता. २७) सकाळपासूनच हे माऊलींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पूजा साहित्यांच्या गजबजलेल्या दुकानांनी मंदिराचा परिसर मंगलमय झाला होता.  “ज्ञानोबा माऊली तुकाराम” हा जयघोष सर्वत्र कानी पडत होता. 

विजया एकादशीनिमित्त मंदिरात अभिषेक, धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले.  

भाविकांच्या गर्दीने मंदिराचा परिसर फुलून गेला होता. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories