वाकड मेट्रो स्थानकावर उभारला ६० मीटर लांबीचा पादचारी पूल, रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित
Jul 03 2026
13
वाकड मेट्रो स्थानकावर उभारला ६० मीटर लांबीचा पादचारी पूल, रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित
पिंपरी, ता. ३ जुलै २०२६ - 'पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कॉर्पोरेशन'तर्फे वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटर लांबीचा पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज – FOB)उभारला आहे. या पुलामुळे नागरीकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येणार आहे. या पुलामुळे मेट्रो स्थानक थेट महामार्गाच्या दुसऱ्या बाजूशी जोडले गेले आहे.
हा पादचारी उड्डाणपूल पुणे मेट्रो मार्ग क्रमांक ३ वरील वाकड मेट्रो स्थानकाला मुंबई–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडील बाजूस जोडतो. त्यामुळे मेट्रो प्रवासी तसेच सर्वसामान्य पादचाऱ्यांना सुरक्षित आणि सोयीस्कररीत्या रस्ता ओलांडता येणार आहे. प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेतला होता.
हा पूल सर्वसामान्य नागरिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य खुला राहणार आहे. पादचाऱ्यांना मेट्रो स्थानकाच्या प्रवेश व्यवस्थेतून न जाता त्याचा वापर करता येईल. पूल कार्यान्वित राष्ट्रीय महामार्गावरील पादचारी आणि वाहनांमधील संभाव्य अपघातांचे प्रमाणही कमी होईल, अशी आशा आहे.
वाकड चौकातील प्रचंड वाहनांची वर्दळ लक्षात घेता, या पुलाची उभारणी हे एक मोठे अभियांत्रिकी आव्हान होते. वाहतुकीवरील परिणाम कमीत कमी राहावा यासाठी हे काम रात्री उशिराच्या वेळेत, वाहतुकीची तीव्रता तुलनेने कमी असताना करण्यात आले. शनिवारी (ता. २७) रात्री या उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आणि स्थापत्य अभियांत्रिकी पथकांनी सलग दोन रात्री अखंड काम करून हा पूल उभारला. सोमवारी (ता. २९) सकाळपर्यंत पुलाची दोन्ही टोके यशस्वीरित्या मेट्रो स्थानकाच्या संरचनेशी जोडण्यात आली.
- public transport infrastructure, metro connectivity, infrastructure development, Pune Metro Line 3, urban mobility
- Foot Over Bridge FOB, Mumbai Bengaluru Highway, pedestrian safety, road crossing safety
- पुणे मेट्रो, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कॉर्पोरेशन, Wakad Metro Station
- वाकड मेट्रो स्थानक, पादचारी पूल, फूट ओव्हर ब्रिज