पिंपरी-चिंचवड शहराला पाणी कमी पडू दिले जाणार नाही - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी कमी पडू दिले जाणार नाही - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी कमी पडू दिले जाणार नाही - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

पुणे, ता. ३ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता भविष्यात  पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासन कालबद्ध कार्यक्रम राबवून अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देणार आहे. या शहराला पाणी कमी पडू दिले जाणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. २) महत्त्वपूर्ण बैठक झाली.  पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या व भविष्यातील पाण्याच्या गरजांबाबत सखोल आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंध्रा, भामा आसखेड आणि पवना या धरणांमधून एकूण १० टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले आहे. सध्या शहरात सुमारे ८ टीएमसी पाण्याचा वापर होत असून मंजूर क्षमतेतील २ टीएमसी पाणी अद्याप उपलब्ध आहे. तसेच पवना धरणातून थेट बंद पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा झाल्यास सध्या होणारी ३० ते ४० टक्के पाण्याची नासाडी टाळता येऊन आणखी सुमारे २ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते, असे मंत्री विखे पाटील यावेळी म्हणाले. 

सन २०४१ पर्यंत शहराची लोकसंख्या जवळपास १ कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचण्याचा अंदाज असून, त्या पार्श्वभूमीवर १,७०९ एमएलडी पाण्याची संभाव्य गरज लक्षात घेऊन ठोकरवाडी धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा अभ्यास करून पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. यावेळी, ठोकरवाडी धरणातील पाणी उपलब्धतेचा सविस्तर अहवाल तयार करून आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले.

या बैठकीत दीर्घकालीन जलस्रोतांची आवश्यकता, अतिरिक्त पाणी आरक्षण, जलसंपदा, औद्योगिक विकास आणि नागरिकांच्या गरजांचा समतोल साधत भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी नियोजनबद्ध निर्णयांवर विशेष भर देण्यात आला, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories