रत्नागिरीतील धबधब्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी; प्रशासनाकडून सुरक्षिततेचे आवाहन*

रत्नागिरीतील धबधब्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी; प्रशासनाकडून सुरक्षिततेचे आवाहन*

रत्नागिरीतील धबधब्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी; प्रशासनाकडून सुरक्षिततेचे आवाहन*

कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक धबधबे पुन्हा प्रवाहित झाले असून, प्रसिद्ध मार्लेश्वर धबधब्यासह विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. हिरवाईने नटलेला परिसर आणि कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक रत्नागिरीकडे आकर्षित होत आहेत.

सुट्टीच्या दिवसांमुळे धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीही निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे नदी-नाले आणि धबधब्यांमधील पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत असल्याने पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, सेल्फी काढण्यासाठी जीव धोक्यात घालू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षित पर्यटनाचा आनंद घ्यावा, असेही प्रशासनाने नागरिकांना सांगितले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories