news
clock

जागतिक महिला दिनी सह दुय्यम निबंधक कार्यालयात महिलांनी पार पाडले कामकाज 

पिंपरी, ता. ९ - जागतिक महिला दिनानिमित्त सह दुय्यम निबंधक कार्यालयात 'महिलांनी महिलांसाठी' या विशेष उपक्रमांतर्गत रविवारी (ता. ८) महिला कर्मचाऱ्यांनी निबंधकाचे कामकाज पार पाडले. या खास उपक्रमासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील दोन सह दुय्यम निबंधक कार्यालये महिला पक्षकार आणि महिला वकिलांसाठी सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवली होती. उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून दोन्ही कार्यालयांमध्ये मिळून एकूण ३७ दस्तांची नोंद झाली.

पिंपरीगाव येथील हवेली क्रमांक २६ आणि भोसरी येथील हवेली क्रमांक १४ ही दोन कार्यालये रविवारी खुली होती. भोसरी येथील हवेली क्रमांक १४ मध्ये एकूण २२ दस्तांची नोंद झाली. यामधून २८ लाख १८ हजार ९६० रुपयांचे मुद्रांक शुल्क तर ३ लाख ७० हजार २५० रुपयांची नोंदणी शुल्क जमा झाले.

उपक्रमात महिला खरेदीदारांच्या लाभातील खरेदीखत, करारनामे, मृत्युपत्र, कुलमुखत्यारपत्र दस्तांची नोंदणी करण्यात आली. दस्त नोंदणीसाठी महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत महिला दिनानिमित्त हवेली क्रमांक २६ पिंपरीगाव येथे प्रभारी दुय्यम निबंधक म्हणून महिला अधिकारी शारदा देशमुख यांनी कार्यभार स्वीकारला होता.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories