news
clock

 पीएमआरडीए गृहप्रकल्पातील हरिश्चंद्रगड सोसायटीत महिला दिन उत्साहात साजरा 

सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महिला अन् लहान मुलींचा उत्स्फूर्त सहभाग 

पिंपरी, ता. ९ - मोशी (सेक्टर १२) येथील पीएमआरडीए गृहप्रकल्पातील हरिश्चंद्रगड सोसायटीतील रहिवाशांनी विविध सांस्कृतिक उपक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा केला. सर्व कार्यक्रमांचे संयोजन महिलांनी एकत्र येऊन अतिशय नेटक्या पद्धतीने केले होते यातून महिलांमध्ये एकी-मैत्री दृढ झाली, हेच या कार्यक्रमाचे वेगळेपण ठरले. 

हरिश्चंद्रगड सोसायटीतीलमध्ये प्रतिवर्षी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यंदा शनिवारी (ता. ७) या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोयायटीतील कार्यक्रम असूनही या कार्यक्रमांची सुंदरशी कार्यक्रमपत्रिका बनवली होती. 

 सुरुवातीला सोसायटी मधील बालकलाकार शांभवी रणपिसे, प्रवणी माळी, अवनी वंगवाड, अनन्या वंगवाड, ओवी कांबळे , रेहाली शिंदे, शिवांशी आंबवणे यांनी संत तुकाराम महाराजांचा अभंग 'खेळ मांडीयेला' यावर बहारदार नृत्य सादर  करुन रसीकांची वाहवा मिळवली. त्यानंतर डॉ. जयश्री बोरुळकर यांनी महिलांना आरोग्य विषयक व्याख्यान सादर करुन अति तात्काळ वैदयकीय प्रसंगाच्या वेळी कशा प्रकारे रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मदत करता येईल याची विस्तृत माहिती दिली. 

सर्व गृहिणींनी पारंपरिक नृत्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. ' द फोक आख्यान' या कार्यक्रमांतील 'माझं राजं छत्रपती झाल गं' या प्रसिद्ध घाटोळीवर भावपूर्ण नृत्य सादर केले. सोनाली हिरवे, संगीता रणपिसे, प्रतिभा कांबळे, पल्लवी माळी, शीतल माळी, जयश्री साबणे, डॉ. जयश्री बोरुळकर, हिमानी भोसले, श्रदधा पामे, अपुर्वा पाटील, शुभांगी वंगवाड, कोमल खंडारे, कल्याणी खंडारे, माधुरी वैदय या मैत्रिणी नृत्यामध्ये सहभागी झाल्या, पुढे विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. सर्व महिलांनी पांरपारिक नऊवारी साडी नेसून महाराष्ट्रातील पारंपारीक लोक नृत्य, तसेच प्रसिदध चित्रपटांमधील गीतांची सांगड घालून अतिशय सुंदर असे समूह नृत्य सादर केले.

श्रुती कुलकर्णी यांनी स्त्री जीवनावर आधारीत सुंदर कविता वाचन करुन कार्यक्रमात रंग भरला. अर्चना राक्षे यांनी स्त्री जीवनाचे विवध पैलू उलगडणारी सुंदर काव्यरचना सादर केली. यानंतर सोसायटीचे सदस्य मिलिंद रणपिसे यांनी 'वऱ्हाड निघालय लंडनला' या एकपात्री विनोदी नाटकातील काही प्रसंग सादर करुन कार्यक्रमाची सांगता केली. स्त्रीशक्तीला वंदन करणारा हा सोहळा स्मरणीय आणि अनुकरणीय ठरला.

सोसायटीचे चेअरमन तुषार साबणे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे निवेदन सोनाली हिरवे यांनी केले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories