गांजा बाळगणाऱ्या तरुणाला निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अटक
पिंपरी, ता. १५ - विक्रीकरता गांजा बाळगणाऱ्या तरुणाला निगडी पोलिसांनी दळवीनगर झोपडपड्डी परिसरातून गुरुवारी (ता. १४) अटक केली आहे. त्याच्याकडून ४०६ ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश तुकाराम शिंगे (वय ३५ वर्षे, बिगारीकाम, रा. ओटा स्किम, निगडी) याने ४०६ ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशिररित्या विक्रीकरीता बाळगला होता. गांजा व रोख रक्कम असा एकूण २०,६००/- किंमतीच माल त्याच्याकडे सापडला. त्याचेकडे मिळालेला गांजा हा त्याने कोणाकडून आणला याबाबत त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गांजा महिलेकडून विक्री करीता आणल्याचे सांगितले. आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपीवर निगडी पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- २०,६०० रुपये, 20,600 INR, आरोपी, Accused, प्रकाश तुकाराम शिंगे, Prakash Tukaram Shinge, बिगारीकाम, Daily wage
- टक, Arrest, जप्त, Seized, ४०६ ग्रॅम, 406 grams, विक्रीकरता, For sale, रोख रक्कम, Cash amount,
- निगडी पोलिस, Nigdi Police, दळवीनगर झोपडपड्डी, Dalvi Nagar Slum,
- गांजा, Cannabis, बाळगणारा, Possession, तरुण, Young man