news
clock
कार खरेदीत सवलत देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

कार खरेदीत सवलत देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

कार खरेदीत सवलत देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक 

पिंपरी, ता.  ८ - सवलतीच्या दरात कार खरेदी करण्याच्या व्यवहारात ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या इसमाविरोधात गुरुवारी (ता. ७) हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक  २८ ऑक्टोबर २०२४ ते  ७ मे २०२६ पर्यंत हिंजवडीत घडली आहे. 

याबाबत, दत्तात्रेय रामचंद्र गाडे (वय ३५ वर्षे, रा. रावेत) यांन तक्रार दिली आहे. त्यानुसार, आरोपी प्रतिक बाबुलाल मुंदडा (रा. हिंजवडी) याच्याविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३१६(२) ३१८ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने डिस्काउंट मध्ये कार देतो असे म्हणून फिर्यादी दत्तात्रेय गाडे यांना कार बुक करायला लावली व  कसलीही सवलत न देता त्यांच्याकडून कारचे नावाखाली तसेच उसने असे एकूण १४ लाख ९१ हजार ८७५/- रुपये घेतले. त्यापैकी १ लाख ५ हजार रुपये परत दिले. उर्वरीत १३ लाख ८६ हजार ८७५/- रुपये परत दिले नाही.  तसेच इतर काही साक्षीदार व फिर्यादी दत्तात्रेय यांच्या मित्रांकडूनही कार २० टक्के डिस्काउंटमध्ये देतो अशी बतावणी करुन अकाउंटद्वारे रोखीने  व क्रेडिट कार्डद्वारे १ कोटी ३६ लाख ९७ हजार ९४२/- रुपये घेतले. आरोपीने एकूण १ कोटी ५० लाख ८४ हजार ८१७/- रुपये ग्राहकांकडून घेऊन त्यांच्या पैशाचा अपहार केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories