news
clock
ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या युवकाला अटक

ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या युवकाला अटक

ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या युवकाला अटक 

पिंपरी, ता. ५ - लोकांकडून पैसे घेऊन ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या ३० वर्षीय युवकाला पोलिसांनी बुधवारी (ता. ४) त्रिवेणीनगर चौक-तळवडे येथे अटक केली आहे. महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे युवकावर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिवेणीनगर चौक-तळवडे येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी माहुल बाबासाहेब जावळे (वय ३० वर्षे, रा. संजयनगर, सेक्टर २२, ओटास्किम निगडी) हा फन अॅण्ड जॉय या ऑनलाईन गेमवर लोकांकडून पैसे घेऊन जुगार खेळत होता. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा एकूण ११ हजार १२०/- रुपयांचा माल जप्त केला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories