पुणे व पिंपरी-चिंचवडमधील ५९ आरएमसी कॉंक्रीट प्रकल्प बंद करण्याचे आदेश,  प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई 

पिंपरी, ता. २  -  शहरात मोठ्या संख्येने सुरु असलेल्या विकासकामांमुळे तसेच बांधकामांमुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता अत्यंत ढासळली आहे. त्यामुळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि हवेची गुणवत्ता बिघडविणारे पुणे व पिंपरी-चिंचवडमधील तब्बल ५९ 'रेडीमिक्स कॉंक्रीट' (आरएमसी) आणि स्टोन क्रशर प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले आहेत आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही महापालिका, जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती 'एमपीसीबी'चे प्रादेशिक अधिकारी बाळासाहेब कुकडे यांनी दिली आहे.

मोठमोठ्या विकासकामांसाठी आरएमसी प्लांट उभारले जातात, मात्र तेथे नियमांचे पालन केले नाही तर धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन प्रदूषण वाढते. त्यामुळे, महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला  ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. 

महत्त्वाचे म्हणजे निर्धारित वेळेत शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेला पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. 

तातडीच्या उपाययोजनांमध्ये, रस्त्यांवर धूळ उडणार नाही यासाठी नियमित स्वच्छता करणे, फॉगर मशीन आणि पाणी फवारणी टँकरचा वापर वाढवावा, कचरा किंवा तत्सम पदार्थ उघड्यावर जाळले जाऊ नयेत, यासाठी सूचना फलक लावावेत,  चौकांमधील कारंजे/फवारे नियमित चालवून त्यांची वेळ वाढवावी यांचा समावेश आहे. 






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance