चारशे महिलांना शिवणयंत्रांचे वाटप, महिला सक्षमीकरणासाठी आमदार अमित गोरखे यांचा पुढाकार 

पिंपरी, ता. ९ - ''महिला सक्षमीकरण हा केवळ शब्द नसून तो कृतीचा विषय आहे. जेव्हा एक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि समाज प्रगतीपथावर जातो. प्रभाग क्रमांक १० मधील भगिनींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम त्यांच्या आयुष्यात परिवर्तनाची नवी पहाट घेऊन येईल,'' असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गणपत गोरखे यांनी व्यक्त केला.

 माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक १० मध्ये आमदार अमित गोरखे यांच्या संकल्पनेतून आणि विशेष प्रयत्नांतून आयोजित 'मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण व किट वाटप' सोहळा शनिवारी (ता. ७) मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाद्वारे परिसरातील ४०० गरजू महिलांना प्रशिक्षणांनंतर प्रत्यक्ष शिलाई मशीन किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.


कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माता रमाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर, एकूण ४०० शिवणयंत्र व किटचे वाटप महिलांना करण्यात आले. आमदार गोरखे म्हणाले, ''तुम्ही जिद्दीने आणि मेहनतीने चांगले काम करण्यासाठी पुढे या. तुमच्या हाताला काम मिळवून देण्याची आणि तुम्हाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे. केवळ साहित्य वाटप करून आमचे कर्तव्य संपत नाही, तर या माध्यमातून माता-भगिनींच्या कौशल्याला वाव मिळून त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. यापुढेही महिलांच्या रोजगारासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध शासकीय योजना आणि वैयक्तिक स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत.''

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या भगिनींनी मनोगत व्यक्त केले. ''आमदार अमित गोरखे यांच्यामुळे आम्हाला केवळ कौशल्य मिळाले नाही, तर सन्मानाने जगण्याचे साधन मिळाले आहे.'' अशी भावना भगिनींनी व्यक्त केली. यावेळी, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माननीय नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेविका सुप्रिया चांदगुडे आणि माजी नगरसेविका जयश्री वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance