news
clock
खोट्या बतावणीला बळी पडून सव्वा लाखांची फसवणूक

खोट्या बतावणीला बळी पडून सव्वा लाखांची फसवणूक

खोट्या बतावणीला बळी पडून सव्वा लाखांची फसवणूक 

पिंपरी, ता. २४ - 'गॅसचे बिल भरायचे राहिले आहे.' अशा बतावणीला बळी पडून एका इसमाची १ लाख १५ हजार २३५ रुपयांची फसवणूक झाली आहे. ही घटना २ जानेवारी २०२६ ला घडली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात निगडी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता.२३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत विकास कुमार नामक व्यक्ती आणि वेगवेगळ्या बँकेचे अंकाउट धारक आरोपी आहेत. आरोपीने फिर्यादीशी संपर्क साधून तुमचे एमएनजीएल गॅसचे बिल भरायचे राहीले आहे असे सांगितले व फिर्यादीला  Bill update Apk file पाठवून त्याद्वारे एकूण १ लाख १५ हजार २३५/- रुपये ऑनलाईन घेतले. 

पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपींविरोधात भारतीय न्यास संहिता. २०२३ कलम ३१८ (४), माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories