news
clock
बळजबरीने युवकाचे ८ हजार रुपये लंपास

बळजबरीने युवकाचे ८ हजार रुपये लंपास

बळजबरीने युवकाचे ८ हजार रुपये लंपास

पिंपरी, ता. ९ - जबरदस्तीने एका युवकाच्या खिशातून ८ हजार रुपये काढून घेतल्याची घटना रविवारी (ता. ८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मोशी येथील संतनगर चौक ते जय गणेश साम्राज्य चौकादरम्यान घडली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.  

याबाबत, बिपीन नंदलाल चौधरी (वय २८ वर्षे, रा. गुरुकृपा सोसायटी, मोशी) याने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी मूळचा उत्तरप्रदेशातील असून सध्या मोशीमध्ये राहतो. त्याचा रंगकामाचा व्यवसाय आहे. तो संतनगर चौक ते जय गणेश साम्राज्य चौकातून रविवारी सायंकाळी पायी जात होता. तेव्हा, आरोपी मनोज काळुराम गायकवाड (वय ३४ वर्षे, रा. पुणे स्टेशन) व त्याच्या साथीदाराने दुचाकीवरुन येऊन फिर्यादी बिपीन याला थांबवले व त्याच्या पॅन्टच्या खिशातून बळजबरीने ८ हजार रुपये काढून घेतले. 

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories