news
clock
भोसरी परिसरात १० ते २६ फेब्रुवारीपर्यंत वाहतूकीत बदल, पोलिस भरतीवेळी ट्रॅफीक जॅमच्या शक्यतेमुळे तात्पुरते पर्यायी मार्ग निश्चित

भोसरी परिसरात १० ते २६ फेब्रुवारीपर्यंत वाहतूकीत बदल, पोलिस भरतीवेळी ट्रॅफीक जॅमच्या शक्यतेमुळे तात्पुरते पर्यायी मार्ग निश्चित

भोसरी परिसरात १० ते २६ फेब्रुवारीपर्यंत वाहतूकीत बदल, पोलिस भरतीवेळी ट्रॅफीक जॅमच्या शक्यतेमुळे तात्पुरते पर्यायी मार्ग निश्चित

पिंपरी, ता. ९ - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत भरती प्रक्रिया सुरु होत आहे. या भरतीमधील उमेदवारांचे शारीरीक मोजमाप व मैदानी चाचणी भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुलामध्ये ११ फेब्रुवारी २०२६ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. त्यावेळी, या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ शकते त्यामुळे १० ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत परिसरातील वाहतूकीत तात्पुरते बदल करण्यात येत आहे. 

त्यानुसार, नागरीकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आदेश पिपंरी चिंचवड शहर, वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त  विवेक पाटील यांनी जारी केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील पोलीस, अग्निशामक, अॅम्ब्युलन्स इ. वाहने यांना वाहतूकीतील या बदलांतून वगळले आहे.  

वाहतूकील तात्पुरते बदल पुढीलप्रमाणे आहेत....

- चिखली वाहतुक विभाग - भोसरी-इंद्रायणीनगर महादेव मंदिर ते श्री स्वामी समर्थ सी.बी.एस.ई स्कुल गेट नं.२ दरम्यानच्या रस्त्यावरुन सर्व प्रकारच्या वाहनांना येण्या-जाण्यास मनाई करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग - १. भोसरी तिरूपती (सहारा) चौकाकडून संत ज्ञानेश्वर क्रिडांगण मार्गे इंद्रायणीनगर स्वीट कॉर्नर चौकाकडे जाणारी वाहतूक श्री समर्थ सी.बी.एस.ई. स्कुल गेट नं-२ येथे उजव्या बाजूला वळून इंद्रायणीनगर पोलीस वसाहत मिनी मार्केट मार्गे रामकृष्ण मोरे प्रवेश व्दारातून बाहेर पडून इच्छित स्थळी जातील. पर्यायी मार्ग - २. भोसरी इद्रायणीनगर स्वीट कॉर्नर चौकाकडून संत ज्ञानेश्वर क्रिडांगण या मार्गे तिरूपती (सहारा) चौकाकडे जाणारी वाहतूक महादेव मंदिर येथून डावे बाजूस वळून रामकृष्ण मोरे प्रवेशव्दारातून मिनी मार्केटच्या पुढे राकेश स्वीट मार्ट मार्गे इच्छित स्थळी जातील.

--------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories