news
clock
शिवजयंती उत्सवासाठी १९ फेब्रुवारीला हिंजवडीमध्ये वाहतूक मार्गात बदल

शिवजयंती उत्सवासाठी १९ फेब्रुवारीला हिंजवडीमध्ये वाहतूक मार्गात बदल

शिवजयंती उत्सवासाठी १९ फेब्रुवारीला हिंजवडीमध्ये वाहतूक मार्गात बदल

पिंपरी, ता. १७ - प्रतिवर्षीप्रमाणे यंदा हिंजवडीमध्ये शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. शिवजयंतीला (ता. १९) सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत मिरवणुका निघणार आहेत. हिंजवडी गावठाणातील विठ्ठल रुक्मीणी मंदिर ते हिंजवडीतील श्री शिवाजी महाराज चौकापर्यंत मिरवणूक मार्ग असणार आहे. शिवजयंती उत्सवासाठी होणाऱ्या गर्दीमुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, १९ फेब्रुवारीला हिंजवडी परिसरातील वाहतूक मार्गात दुपारी ३ ते रात्री ११ या वेळेत बदल करण्यात येणार आहेत. नागरीकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, अशी सूचना पिपंरी-चिंचवड शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी जारी केली आहे.

असे असतील वाहतूकीतील बदल - कस्तुरी चौक ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक रस्ता सर्व प्रकारचे वाहनांचे वाहतुकीस बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग १. :- मारुंजी वाय जंक्शन चौकाकडुन कस्तुरी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणारी वाहतूक ही कस्तुरी चौक येथुन उजवीकडे वळुन विनोदे वस्ती मार्गे व डावीकडे वळुन इंडियन ऑईल चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

पर्यायी मार्ग २.:- मेझा-९ चौकाकडून हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहतूक ही श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सरळ पुढे जाऊन इंडियन ऑईल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती मार्गे इच्छित स्थळी जातील.

पर्यायी मार्ग ३.:-शिवाजी चौकातुन यु-टर्नघेवुन जांभुळकर जीम चौक मार्गे हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहतूक ही जांभुळकर जीम चौकातून सरळ पुढे इंडियन ऑईल चौक, कस्तुरी चौक, विनोदे वस्ती चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

पर्यायी मार्ग ४.:- मेझा-९ चौकाकडून श्री शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या दोन लेन पैकी डावी लेन बंद करून सर्व वाहतूक ही उजव्या बाजूच्या लेनने सुरू राहील.

--------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories