पिंपरी-चिंचवड
महापालिकेतील राष्ट्रवादीच्या गटनेत्याची आज होणार निवड, पक्ष पदाधिकाऱ्यांची माहिती
Feb 04 2026
88
महापालिकेतील राष्ट्रवादीच्या गटनेत्याची आज होणार निवड, पक्ष पदाधिकाऱ्यांची माहिती
पिंपरी, ता. ४ - पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्याची निवड बुधवारी (ता. ४) होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व वरिष्ठांशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या शहरातील सूत्रांनी दिली आहे.
पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सद्यःपरिस्थितीत शहरात पक्षाचे संघटन अधिक बळकट करणारे आणि विरोधकांच्या तुल्यबळ असणारे नेतृत्व गटनेता पदासाठी निवडावे लागणार आहे. त्यामुळे, या कसोटीवर उतरणारा कोणता नेता गटनेता पदावर निवडला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.