news
clock

पवना जलवाहिनीच्या कामाला निधीसह तात्काळ गती द्यावी - नगरसेवक राहुल कलाटे 

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाकडे मागणी 

पिंपरी, ता. १४ - पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. १३) पार पडली. ही  सर्वसाधारण सभा महिन्यानंतर होत आहे. या कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर ठोस कृती काय झाली ? याबद्दल प्रशासनाकडून नेमके उत्तर भाजपचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी मागितले. स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील वाकड, ताथवडे, पुनावळेसह रावेत पम्पिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा होत असलेल्या भागाला नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी पवना जलवाहिनीच्या कामाला निधीसह तात्काळ गती देण्यात यावी, अशी आग्रही मागणी कलाटे यांनी केली. 

कलाटे म्हणाले, ''पाण्यासाठी निधीच्या अभावाचे कारण सांगणे दुर्दैवी आहे, स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा होणे हा नागरिकांचा अधिकार आहे. भाजपने सत्तेत येताना पिंपरी-चिंचवडकरांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले असून ते पूर्ण करणे आपले आद्य कर्तव्य आहे. शहरातील अनेक भागांत पाणीटंचाईच्या तक्रारी कायम आहेत. उन्हाळ्यात त्यात मोठी वाढ होते. पवना धरणातून सोडलेले पाणी रावेत येथील पवना नदीच्या बंधार्‍यातून उचलले जाते. ते शुद्ध करुन संपूर्ण शहराला पुरविले जाते. महापौरांनी यापूर्वी जलशुद्दीकरण केंद्राला भेट दिली. महिन्याभरात त्यावर पुढे काय कार्यवाही झाली यावर स्पष्टता देण्यात यावी. रावेत पंपिंग स्टेशन इथे पवना नदी पात्रातील पाण्याचा दर्जा खालावत आहे. त्यासाठी २० लाख रुपये देऊन महापालिकेने नेमलेल्या संस्थेमार्फत नेमके काय काम केले जाईल? याबद्दलही स्पष्टता देण्यात यावी.''

''पवना जलवाहिनी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याबाबत कलाटे यांनी आक्रमक भूमिका मांडली. निधी अभावी पवना जलवाहिनी प्रकल्प पुढे ढकलताना प्रशासनाला हे समजून घ्यावे लागेल की प्रकल्पाला विलंब होईल तसा त्याचा खर्च देखील वाढतच जाणार आहे. पवना जलवाहिनी प्रकल्पाला गती देण्याची आवश्यकता आहे. १५ वर्षांपासून ते काम ठप्प आहे. आत्तापर्यंत तब्बल २०० कोटी रुपये खर्च झाले असून, एकूण चारशे कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा खर्च आत्ता तब्बल १२५६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तरीही हा प्रकल्प कागदावरच आहे. त्यामुळे यावर तातडीने कार्यवाही आवश्यक आहे.'', असे ते म्हणाले. पुढे, स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीबाबतही कलाटे यांनी काही मुद्दे सुचवले. 


पवना जलवाहिनी प्रकल्पाला गती द्यावी...

''नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने बजेटचे कारण सांगणे दुर्दैवी आहे. स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा करण्याचे भाजपने पिंपरी चिंचवडकरांना आश्वासन दिले आहे. ते पूर्ण झालेच पाहिजे. यासाठी आवश्यक त्या निधीची तातडीने पूर्तता करून पवना जलवाहिनी प्रकल्पाला गती देण्यात यावी. ''

- राहुल कलाटे, नगरसेवक, भाजप



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories