news
clock
स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणे यांचा अर्ज दाखल

स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणे यांचा अर्ज दाखल

 स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणे यांचा अर्ज दाखल

इतर विषय समित्यांच्या सभापती पदासाठीही उमेदवारांचे अर्ज दाखल

पिंपरी, ता. २६ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अभिषेक बारणे यांनी बुधवारी (ता. २५) आपला उमेदवारी अर्ज नगरसचिव कार्यालयात दाखल केला. तसेच विविध विषय समित्यांच्या सभापती पदांसाठी इच्छुक सदस्यांनीही बुधवारीच नगरसचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. हे सर्व अर्ज नगरसचिव मुकेश कोळप यांनी स्विकारले.  

यावेळी आमदार शंकर जगताप, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, उपमहापौर शर्मिला बाबर तसेच सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे उपस्थित होते. शनिवारीच महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यानंतर त्याचदिवशी अर्थसंकल्प सादर होणार आहे. इतर विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड सोमवारी, २ मार्चला होणार आहे. राष्ट्रवादी कॉंगेसने सभापतीपदाच्या निवडणुकीत एकही उमेदवार दिलेला नाही, त्यामुळे ही सभापतींची निवड बिनविरोध होणार आहे.

विविध समित्यांच्या सभापतीपदासाठी अर्ज दाखल केलेले उमेदवार -

१) शहर सुधारणा समितीच्या सभापतिपदासाठी संजय काटे (भाजप) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

२) विधी समितीच्या सभापतिपदासाठी सुजाता बोराटे (भाजप) यांनी अर्ज दाखल केला. 

३) शिक्षण समितीच्या सभापतिपदासाठी रविना सागर अंगोळकर (भाजप) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

४)  महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी राणीमाई पठारे (भाजप) यांनी अर्ज दाखल केला. 

५) क्रीडा-सांस्कृतिक समितीच्या सभापतिपदासाठी कैलास कुटे (भाजप) यांनी अर्ज दाखल केला. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories