रोडरेजमधून वाहनचालकाला मारहाण; दोन रिक्षांचे नुकसान

रोडरेजमधून वाहनचालकाला मारहाण; दोन रिक्षांचे नुकसान

पिंपरी | 12 सप्टेंबर 2026 : अरुंद सर्व्हिस रस्त्यावर वाहनाला बाजू देण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका दुचाकीस्वारासह त्याच्या मामेभावाला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. आरोपीने दोन रिक्षांचे  नुकसान करून जमलेल्या नागरिकांना धमकी दिल्याचा आरोप आहे.

ही घटना 11 सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास अँटो क्लस्टर रोडवरील एचपी चौकाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर घडली. मेहबूब अब्दुल शाह (वय 27) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी जात असताना आरोपी कुत्रा घेऊन जात होता. रस्ता अरुंद असल्याने बाजू देण्यावरून वाद झाला. आरोपीने लाकडी दांडक्याने फिर्यादीला मारहाण केली. त्यांना वाचविण्यास आलेल्या मामेभावालाही मारहाण करण्यात आली.

आरोपीने फिर्यादीची आणि मामेभावाची रिक्षा फोडून नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नागरिक जमा झाल्यानंतर आरोपी निघून गेला.

याप्रकरणी धनंजय कालीदास यादव (वय 29) याला अटक करण्यात आली असून, संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 436/2026 नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories