फेसबुकवरील शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने 1.36 कोटींची फसवणूक

फेसबुकवरील शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने 1.36 कोटींची फसवणूक

चिंचवड | 12 सप्टेंबर 2026 : फेसबुकवरून संपर्क साधत शेअर ट्रेडिंगमध्ये आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून चिंचवडमधील नोकरदार व्यक्तीची तब्बल 1 कोटी 36 लाख 50 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

हा प्रकार 30 डिसेंबर 2025 ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ऑनलाइन घडला. सुधीर भीवा पोवार (वय 53) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ArpritaSinha नावाच्या फेसबुक आयडीवरून फिर्यादीशी संपर्क साधण्यात आला. शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना Global Prime CS नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले.

त्यानंतर m.globalprimejp.cc या कथित ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची लिंक पाठवून गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. आरोपींवर विश्वास ठेवून फिर्यादीने विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी एकूण 1 कोटी 36 लाख 50 हजार रुपये भरले. मात्र, त्यांना गुंतवणुकीचा परतावा किंवा मूळ रक्कम मिळाली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी फेसबुक आयडीधारक, संकेतस्थळ आणि व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिनविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 39/2026 नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories