छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचा समारोप

छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचा समारोप

छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचा समारोप 

पिंपरी, ता. २३ - छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व व्यापक विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी महापालिकेने आयोजित केलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचा' नुकताच समारोप झाला. 

समारोपाच्या कार्यक्रमात कवी प्रा. प्रशांत मोरे यांचे कविता सादरीकरण झाले. मोरे यांनी आईचा त्याग, माया, संघर्ष आणि प्रेम यांचे विविध पैलू उलगडणाऱ्या कविता सादर केल्या. त्यांनी जिजाऊंच्या संस्कारांची ज्योत आणि शिवरायांच्या कर्तृत्वाची कहाणी उलगडली. संभाजीनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमाला महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories