news
clock
चिखलीत १ लाख ४३ हजार रुपयांचे मॅफेड्रॉन जप्त, आरोपीला अटक

चिखलीत १ लाख ४३ हजार रुपयांचे मॅफेड्रॉन जप्त, आरोपीला अटक

चिखलीत १ लाख ४३ हजार रुपयांचे मॅफेड्रॉन जप्त, आरोपीला अटक

पिंपरी, ता. २० -  बुधवारी (ता. १८) सायंकाळी ६.३० वाजता चिखली पोलीसांनी कुदळवाडी परिसरातून १ लाख ४३ हजार रुपयांचे  ८ ग्रॅम एमडी (मॅफेड्रॉन) जप्त केले आहे. हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या फिरोज फैमुल्ला खान ( वय ३५, मोरेपाटील चौक, कुदळवाडी) याला अटक केली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून मॅफेड्रॉनसह, १ मोटारसायकल, १ मोबाईल फोन आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले. हे मॅफेड्रॉन आरोपींने दुसरा आरोपी बासु सईद (मुंबई) याच्याकडून विक्रीसाठी आणले होते.

आरोपी फिरोज फैमुल्ला खान याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात चिखली पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ख) २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories