news
clock
हिंजवडी आयटी पार्क परिसरातीत कर्मचाऱ्यांसाठी सुरु झालिये अॅप आधारित बससेवा......'कोको राइड्स'

हिंजवडी आयटी पार्क परिसरातीत कर्मचाऱ्यांसाठी सुरु झालिये अॅप आधारित बससेवा......'कोको राइड्स'

 हिंजवडी आयटी पार्क परिसरातीत कर्मचाऱ्यांसाठी सुरु झालिये अॅप आधारित बससेवा......'कोको राइड्स'

'रुटमॅटिक' कंपनीचा पुढाकार,  हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन, एमआयडीसी व आरटीओ'चे सहकार्य

पिंपरी, ता. ७ - हिंजवडी आयटी पार्क परिसरातीत कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी व  वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रुटमॅटिक या कॉर्पोरेट मोबिलिटी कंपनीने ‘कोको राइड्स’ही ॲप-आधारित शटल बस सेवा सुरू केली आहे. हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन (एचआयए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांच्या सहकार्याने नुकतीच ही  सेवा सुरु झाली आहे. आयटी पार्कमधील इन्फोसिस कंपनीच्या कार्यालयापासून या सेवेचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे (एचआयए)  अध्यक्ष सुब्रमण्यम राधाकृष्णन, ‘रूटमॅटिक’चे संस्थापक व मुख्याधिकारी श्रीराम कन्नन आणि कार्यकारी संचालक कविता रामचंद्रगौडा उपस्थित होते. यावेळी रुटमऍटिकचे मुख्याधिकारी कन्नन यांनी सांगितले की, ''तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या कामगार संख्येमुळे प्रवासाच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. ‘कोको राइड्स’सारख्या सामायिक वाहतूक सेवांमुळे प्रवास अधिक सुटसुटीत, विश्वासार्ह  होईल. पुण्यानंतर ही सेवा इतर शहरांतही विस्तारण्याचा आमचा मानस आहे.''

‘एचआयए’च्या सदस्य असलेल्या ऐंशीहून अधिक कंपन्यांमधील हजारो कर्मचाऱ्यांना या बससेवाचा लाभ होणार आहे. या सेवेत सुरुवातीला ८० हून अधिक बस ७० पेक्षा जास्त मार्गांवर धावणार आहेत. पुणे शहरातील ५०० पेक्षा अधिक पिकअप पॉइंट्सना जोडले जाणार आहे. दररोज सुमारे २० हजार प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.  ही सेवा पूर्णपणे ॲप-आधारित असून, कर्मचारी ठरावीक वेळापत्रक आणि निश्चित दरांवर आसन आरक्षित करता येतील. त्याचे दर १०० रुपयांपासून आहेत.  

हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा पाच वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरु करण्यात आली आहे. सन २०१४ मध्ये हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन (एचआयए) आणि एमआयडीसी यांच्या पुढाकाराने ही सेवा सुरु झाली होती. तेव्हा सुप्रीम ट्रान्स कॉन्सेप्ट्स, महिंद्रा लॉजिस्टिक्स, प्रसन्ना पर्पल आणि फोर्ड ऑफिसराइड या कंपन्या सेवेत सहभागी होत्या. 



-

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories