news
clock
बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास अजित पवार यांचे नाव देण्याची अधिसूचना जारी

बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास अजित पवार यांचे नाव देण्याची अधिसूचना जारी

बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास अजित पवार यांचे नाव देण्याची अधिसूचना जारी

पिंपरी, ता. ३ - बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असणारे सर्वोपचार रुग्णालय तसेच मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयास दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव दिले जाणार आहे. या दोन्ही रुग्णालयांच्या उभारणीत अजित पवार यांचे मोलाचे योगदान होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास यापूर्वी दिलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे नाव कायम राहणार असून या अंतर्गत असलेल्या रुग्णालयास स्व. अजितदादा पवार सर्वोपचार रुग्णालय असे नाव देण्याची अधिसूचना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने सोमवारी (ता. २) जारी केली.  मेडद येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाचेदेखील स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय असे नामकरण करण्यात येणार आहे.

' स्वर्गीय अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तसेच विविध महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री व वित्त मंत्री म्हणून कार्यरत असताना राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले होते. जिल्हास्तरीय वैद्यकीय पायाभूत सुविधा बळकट करणे, नवीन वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालयांची स्थापना करणे, आधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता वाढविणे तसेच ग्रामीण भागामध्ये तृतीयस्तरीय आरोग्यसेवेचा विस्तार करण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारामुळे बारामती परिसरातील आरोग्य व शैक्षणिक विकासास गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील बारामती येथे वैद्यकीय शिक्षणाच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय व शासकीय आयुर्वेद महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांचे नामकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.' असे अधिसूचनेत म्हटले आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories