राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड

पिंपरी, ता. २६ - राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी अजितदादांनतर सुनेत्रावहिनींकडे आल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये समाधानाची भावना आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकी आज, गुरुवारी वरळी डोम येथे झाली. या बैठकीत   

पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाध्यक्ष पदासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी पाठिंबा दर्शवला. यानंतर पटेल यांनी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याची घोषणा केली.

यावेळी, सर्व नेतेमंडळी सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असून आता पक्ष बळकट करण्यावर भर देण्यात येईल, असे पटेल यांनी सांगितले. माजी अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त झाले होते.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories