news
clock
खरात प्रकरणातील साडेचारहजार व्हायरल लिंक्स एसआयटीने केल्या नष्ट

खरात प्रकरणातील साडेचारहजार व्हायरल लिंक्स एसआयटीने केल्या नष्ट

खरात प्रकरणातील साडेचारहजार व्हायरल लिंक्स एसआयटीने केल्या नष्ट 

विशेष तपास पथकाच्या प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची पत्रकार परिषदेत माहिती 

पिंपरी, ता. ८ - भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या तपासाची सविस्तर माहिती विशेष तपास पथकाच्या प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते  यांनी मंगळवारी (ता. ७) पत्रकार परिषदेत दिली. खरातचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विशेष तपास पथकाच्या  सायबर सेलने व्हायरल झालेल्या ४ हजार ६५० लिंक काढून नष्ट केल्या आहेत आणि आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणारे ४५१ अकाउंट कायमस्वरुपी काढून टाकली आहेत, अशी माहिती सातपुते यांनी दिली.

खरातच्या मालमत्तेसंदर्भातील शंभरपेक्षा अधिक दस्तऐवज सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात दिले आहेत. खरात याच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी (ता. ८) संपत आहे. त्यामुळे त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयासमोर हजर केले जाणार असून, त्याला तिसऱ्या गुन्ह्यात 'एसआयटी'कडून ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. खरात प्रकरणाबाबत 'एसआयटी'ने आज पत्रकार परिषद घेतली. 

सातपुते यांनी सांगितले की, अशोक खरात विरुद्ध नाशिक आणि अहिल्यानगर जिल्हा या दोन्हींमध्ये मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत. बारा गुन्ह्यांपैकी 9 गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे.  2 गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करत आहेत. एका गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत. अशोक खरात विरुद्ध नसलेले मात्र या विषयाशी संबंधित असे दोन गुन्हे दाखल आहेत. त्या दोन गुन्ह्यांचा देखील तपास आम्हीकरत आहे. त्यामुळे अशोक खरात विरोधातील 9 आणि त्याच्या विरोधात नसलेले पण संबंधित असलेले 2 गुन्हे असे एकूण 11 गुन्हे आमच्याकडे तपासाला आहेत. 

अशोक खरात विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी आमच्याकडे असलेल्या गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत. आणि उर्वरित तीन गुन्हे हे फसवणूक आणि त्याच्या सोबतच अंधश्रद्धा विरोधी कायदा अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम 2014 आणि इकॉनॉमिकऑफेन्स संदर्भातील कलमांचा समावेश आहे, अशी माहिती सातपुते यांनी दिली. 

महिला लैंगिक अत्याचाराचे सर्वच्या सर्व आठ गुन्हे आणि फसवणुकीचा एक गुन्हा असे नमुने एसआयटी कडे तपासाला आहेत. आजपर्यंतच्या तपासा दरम्यान 30 पेक्षा अधिक साक्षीदारांकडं एसआयटीने चौकशी केली आहे. साक्षीदारांकडे आणि पिडितांकडे  आपण जी चौकशी केली त्यातून आरोपी हा पिडीत व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. त्यांना भीती दाखवत होता. खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधि इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता. महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत होता. महिलांना त्यांच्या कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता. त्याच पद्धतीने ईशान्येश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हातचालाखीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भाषण समाजामध्ये सातत्याने अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत होता, असं निष्पन्न होत आहे, असे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.  

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories