news
clock
बँकेत महिलेच्या पर्समधून १० हजार रुपये लंपास, दोन आरोपींना अटक

बँकेत महिलेच्या पर्समधून १० हजार रुपये लंपास, दोन आरोपींना अटक

बँकेत महिलेच्या पर्समधून १० हजार रुपये लंपास, दोन आरोपींना अटक 

पिंपरी, ता. २८ - भोसरीतील लांडेवाडी परिसरातील बॅंकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून १० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी (ता. २७) दुपारी घडली. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी मध्यप्रदेशातील दोन आरोपींना अटक केली आहे.

याबाबत संबंधित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने  गुरुवारी (ता. २७) दुपारी १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास बँक खात्यातून ६० हजार रुपये काढून ते पर्समध्ये ठेवले होते. गर्दीचा फायदा घेत अज्ञातांनी पर्समधून १० हजार रुपये चोरुन नेले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.  आसाना रघुवीर सिसोदीया (वय ३२, रा. राज्य मध्यप्रदेश) व ललिता मलखान सिसोदीया (वय ३० वर्षे, रा. राज्य मध्यप्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. 

 लबाडीच्या हेतूने रक्कम चोरल्याप्रकरणी आरोपींवर भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories