news
clock
भोसरीत १६ किलो गांजा जप्त; दोन आरोपी अटकेत

भोसरीत १६ किलो गांजा जप्त; दोन आरोपी अटकेत

भोसरीत १६ किलो गांजा जप्त; दोन आरोपी अटकेत

पिंपरी, ता. १८ - भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (ता. १७) दोन २४ वर्षीय युवकांकडून तब्बल ८ लाख ८० हजार रुपयांचा १६ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. गांजा बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  १७ फेब्रुवारीला रात्री १.३० वाजता भोसरी येथे गोविंद गार्डनजवळ आरोपी विशाल रावण मोहिते (वय २४ वर्षे ) व गणेश बाबुराव बोरात (वय २४ वर्षे) या दोघांकडे ८ लाख ८० हजार रुपये किंमतीचा १६ किलो १२० ग्रॅम गांजा सापडला. हे दोघे साई पार्क-दिघी येथील रहिवासी आहेत.

त्यांनी विक्रीसाठी हा गांजा सोबत बाळगला होता.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories