news
clock

भोसरी एमआयडीसी परिसरात गांजासह तरुण अटकेत

पिंपरी, ता. ९ - एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाई करत गांजासह एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ६७ हजार ६०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार (ता. ८)  दुपारी सुमारे ३.४५ वाजण्याच्या सुमारास बालाजी नगर, एमआयडीसी भोसरी परिसरात टोयोटा शोरूमजवळ भोसरी ते निगडी मार्गावर ही कारवाई करण्यात आली. एमआयडीसी भोसरी पोलिस स्टेशनचे पोलीस शिपाई गजानन विष्णू आढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विशाल दिलीप साळवे (वय १९, रा. बालाजी नगर, एमआयडीसी भोसरी, पुणे) असे आहे. पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या होंडा अ‍ॅक्टिव्हा दुचाकी (क्र. एमएच १४ एमएन ७७८७) च्या डिकीत १ किलो ३५२ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. या गांजाची किंमत सुमारे ६७,६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत कलम ८(क), २०(ब)(२)(ब) अन्वये एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस  करत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories