साडेसात लाखांहून अधिक किंमतीचे अफिम जप्त, युवकाला अटक
पिंपरी, ता. १८ - साडेसात लाखांहून अधिक किंमतीचा अफिम हा अंमलीपदार्थ बाळगणाऱ्या २५ वर्षीय युवकाला मंगळवारी (ता. १७) शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मुबंई-पुणे एक्सप्रेस-वे वर वडगाव महामार्ग कर्यालयासमोर सर्व्हिस रोड लगत करण्यात आली.
आरोपी रोशनलाल नारायणलाल जाट (वय २५ वर्षे) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो मूळचा राजस्थानमधील आहे. आरोपीने ९८० ग्रॅम वजनाचा एकूण ७ लाख ८४ हजार रुपये किंमतीचा अफिम हा अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या विक्रीसाठी बाळगळा होता. पोलिसांनी त्याच्याकडील अफिम जप्त केले आहे.
आरोपीविरोधात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), १७ (ब) नुसार शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे