news
clock

स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडून साज जणांची नावे जाहीर 

पुणे, ता. ९ - पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पक्षाने सात जणांची नावे जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन तर काँग्रेस कडून एका उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज स्वीकृत नगरसेवक पदासाठीच्या नावांवर शिक्कामोर्तब करून या संदर्भातले पत्र सभागृह नेते गणेश बिडकर यांना दिले. यामध्ये जयप्रकाश पुरोहित, विश्वास ननावरे, प्रिया शेंडगे, उदय लेले, राजेंद्र काकडे, निलेश कोंढाळकर, रवींद्र साळेगावकर या सात जणांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दत्ता धनकवडे आणि राकेश कामठे या दोघांची नावे निश्चित केली. 

काँग्रेसकडे स्वीकृत नगरसेवक पद अशी एक जागा आहे त्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब आहे.

स्वीकृत नगरसेवक पदासाठी महापालिकेत दहा जागा आहेत. यापैकी सात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस दोन आणि काँग्रेसकडे एक जागा आहे. या पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी (ता. ९) सकाळी ११ ते दुपारी २ होती. तिन्ही पक्षाच्या घटनेच्या नेतृत्वात आज या स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत. मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेत या उमेदवारांची अधिकृतपणे निवड केली जाईल.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories