news
clock
महिला दिनानिमित्त महिलांसाठी रोजगार मेळाव्याचा उपक्रम

महिला दिनानिमित्त महिलांसाठी रोजगार मेळाव्याचा उपक्रम

महिला दिनानिमित्त महिलांसाठी रोजगार मेळाव्याचा उपक्रम 

पिंपरी,  ता. ९ - निगडी येथील ज्ञानगंगा सोशल फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी तळवडे येथे रोजगार व्यवसाय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. परिसरातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजिका अनुपमा एकांडे यांनी महिलांना व्यवसाय विषयी मार्गदर्शन केले. तसेच महिलांना व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय याबाबत महिलांशी संवाद साधला. वंदना धकाटे आणि अॅड. रेशमा गोठे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 

महिलांसाठी गप्पागोष्टी, खेळ असे मनोरंजनपर उपक्रम घेण्यात आले. त्याचा महिलांनी मनमुराद आनंद घेतला. ज्ञानगंगा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश बाठे, अमृता बाठे आदींनी संयोजन केले. शुभम खेडेकर यांनी सूत्रसंचालन केले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories