news
clock
महापालिका अर्थसंकल्प सादर होताना आयुक्त व पत्रकारांमध्ये वाद, सभागृहात पत्रकारांच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प सादर

महापालिका अर्थसंकल्प सादर होताना आयुक्त व पत्रकारांमध्ये वाद, सभागृहात पत्रकारांच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प सादर

महापालिका अर्थसंकल्प सादर होताना आयुक्त व पत्रकारांमध्ये वाद, सभागृहात पत्रकारांच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प सादर

पिंपरी, ता. २८ - सन २०२६-२७ चा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी (ता. २८) स्थायी समितीला सादर करण्यात आला. स्थायी समितीच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी नेहमीप्रमाणे पत्रकार स्थानापन्न झाले. यावेळी, पत्रकारांनी मागे जावे आणि तिथे पुढे अधिकाऱ्यांनी बसावे, अशी सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. आयुक्तांच्या या अयोग्य व अनावश्यक सूचनेमुळे पत्रकार सभागृहाबाहेर पडले. या वर्षी महापालिकेचा अर्थसंकल्प पत्रकारांच्या अनुपस्थितीत सादर झाला. 

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी  स्थायी समिती सभापतीपदी अभिषेक बारणे यांची निवड झाली. त्यावेळी  सभागृहात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते परवानगी विना उपस्थित होते. मात्र, त्यावेळी आयुक्तांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना 'मागे व्हा', अशी सूचना देण्याचे धाडस दाखवले नाही. पण, वार्तांकनाची जबाबदारी पार पाडणाऱ्या पत्रकारांना मात्र मागे बसण्याची अयोग्य सूचना केली. 

विशेष म्हणजे, पत्रकारांनी आयुक्तांच्या सूचनेवर नाराजी व्यक्त केली तरी,  ''अर्थसंकल्प सादर झाल्यावर मी पत्रकारांशी बोलेन'' असे आयुक्त म्हणाले. त्यामुळे पत्रकार आणि आयुक्तांमध्ये वाद झाला. पत्रकारांनी आयुक्तांना स्पष्ट विचारणा केली की, ''एकतर भाजपचे हौशे-नौशे कार्यकर्ते आत आले, त्यावेळी आपण शांत राहिलात,  मग आता नको ते नियम सांगून आपण काय साध्य करताय ? '' या प्रश्नावर आयुक्त हर्डीकर निरुत्तर झाले. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories