news
clock
छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या कामात 'रिंग' ?,  दोन प्रस्ताव 'स्थायी'मध्ये तहकूब, निविदा प्रक्रियेवर सदस्यांची शंका

छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या कामात 'रिंग' ?, दोन प्रस्ताव 'स्थायी'मध्ये तहकूब, निविदा प्रक्रियेवर सदस्यांची शंका

छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या कामात 'रिंग' ?,  दोन प्रस्ताव 'स्थायी'मध्ये तहकूब, निविदा प्रक्रियेवर सदस्यांची शंका

पिंपरी, ता. ११ - पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाच्या पुढच्या टप्प्यातील दोन कामांवर बुधवारी (ता. ११) स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. यामध्ये कामावर होणारा खर्च, निविदांमधील दर आणि प्रक्रियेवरुन ‘रिंग’ झाल्याचा संशय सदस्यांनी व्यक्त केला. या कामात कोणताही गैरप्रकार नको, अशी भूमिका सदस्यांनी मांडली. त्यामुळे हे प्रस्ताव तहकूब करण्यात आले असून, कामाची पाहणी केल्यानंतर स्थायी समिती या प्रस्तावांना मान्यता देणार आहे.

स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती अभिषेक बारणे होते. महापालिकेच्या वतीने मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येत आहे. या ठिकाणी त्यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला असून, हा शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. स्मारकाच्या कामासाठी पुढील टप्प्यात सुशोभीकरण व आर्टविषयक कामासाठी ३२ कोटी ३३ लाख ७४ हजार ६९५ रुपये आणि आकर्षक विद्युत रोषणाईसाठी १८ कोटी ६६ लाख ९ हजार ९६५ रुपये अशा दोन निविदा काढण्यात आल्या होत्या. या निविदांबाबत स्थायी समितीत चर्चा झाली. यातील निविदा दर अधिक असून, पात्र ठेकेदारही यापूर्वी काम करणारा आहे. हे स्मारक महत्त्वाचे असून ही प्रक्रिया पारदर्शक होणे आवश्यक असल्याचे मत काही सदस्यांनी मांडले. त्यामुळे दोन्ही कामांचे प्रस्ताव आठवडाभरासाठी तहकूब केले.

दरम्यान, स्थायी समितीचे अध्यक्ष बारणे यांनीही या विषयाबाबत सदस्यांनी काही त्रुटी लक्षात आणून दिल्या. हे काम चांगले व्हावे यासाठी माहिती मागितली असून, कामाची जागेवर आम्ही पाहणी करणार आहोत असे सभापती बारणे यांनी सांगितले. शिवसेनेच्या स्थायी समितीतील सदस्या सुलभा उबाळे म्हणाल्या की, ''छत्रपती संभाजी महाराज अस्मितेचा विषय आहे. हे काम उत्कृष्ट झाले पाहिजे. त्यामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही, ही सर्वांची जबाबदारी आहे. यापैकी एका निविदा प्रक्रियेमध्ये दोनच ठेकेदार सहभागी झाले असून, पूर्वी काम करणाऱ्या ठेकेदाराला हे काम मिळाले. त्याने दिलेला दर अधिक आहे.''

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories