news
clock
बुधवार पेठेत पुन्हा पोलिसांची धडक कारवाई, ११ बांगलादेशी महिलांना अटक

बुधवार पेठेत पुन्हा पोलिसांची धडक कारवाई, ११ बांगलादेशी महिलांना अटक

बुधवार पेठेत पुन्हा पोलिसांची धडक कारवाई, ११ बांगलादेशी महिलांना अटक

पिंपरी, ता. १८ - पुण्यातील बुधवार पेठेत  फरासखाना आणि खडक पोलिस ठाण्यांच्या पथकांनी बुधवारी (ता. १८) मध्यरात्री पुन्हा एकदा छापा टाकला. या कारवाईत ११ बांगलादेशी महिलांसह एकूण २२ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी बुधवार पेठेत धडक कारवाई केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीदाराच्या टिपवर आधारित हा छापा टाकण्यात आला.  ताब्यात घेतलेल्या आलेल्या बांगलादेशी महिलांकडे बोगस आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे आढळली आहेत.  अनधिकृतपणे भारतात वास्तव्य करुन कुंटणखान्यांमध्ये काम करत असल्याचा आरोप या महिलांवर आहे. पोलिस तपासात हे प्रकरण उघडकीस आले आहे. 

यापूर्वी ११ फेब्रुवारीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि परिमंडळ - १ ने बुधवार पेठेत 'कोम्बिंग ऑपरेशन' राबवले होते. यात मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ४१ इमारती आणि गल्लीबोळांची झाडाझडती घेण्यात आली. ७०० हून अधिक नागरिकांची चौकशी करण्यात आली. या कारवाईत दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले, चार अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. 

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशानुसार अवैध स्थलांतर, मानव तस्करी आणि अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात अशी कारवाई सुरु ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.

-----------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories