news
clock
आळंदी फाटा परिसरात पोलिसांचा लॉजवर छापा, वेश्याव्यवसाय उघडकीस

आळंदी फाटा परिसरात पोलिसांचा लॉजवर छापा, वेश्याव्यवसाय उघडकीस

आळंदी फाटा परिसरात पोलिसांचा लॉजवर छापा, वेश्याव्यवसाय उघडकीस 

पिंपरी, ता. २१ - आळंदी फाटा परिसरात (कुरळी, ता. खेड) गुरुवारी (ता. १९) एका लॉजवर छापा टाकून तिथे सुरु असलेला वेश्याव्यवसाय आळंदी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. लॉज मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. 

आळंदी फाटा येथील शिवसाई लॉजवर गुरुवारी (ता. १९) रात्री सुमारे १०.५५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या वेळी लॉज मॅनेजर दिपक मधुकर जाधव (वय २५, रा. समर्थनगर, दिघी) हा चार पिडीत महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याचे उघड झाले.

या वेश्याव्यवसायाद्वारे मिळणाऱ्या पैशांवर आरोपी स्वतःची उपजीविका चालवत होता. पोलिसांनी आरोपीला तत्काळ ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध आळंदी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २०) भारतीय न्याय संहिता कलम १४३(३) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories