news
clock
मोबाईल हॅक करून ६ लाख ४१ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मोबाईल हॅक करून ६ लाख ४१ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मोबाईल हॅक करून ६ लाख ४१ हजारांची ऑनलाईन फसवणूक

पिंपरी, ता. ५ - चऱ्होली परिसरात मोबाईलवर आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक केल्यामुळे मोबाईल हॅक होऊन क्रेडिट कार्डमधून तब्बल ६ लाख ४१ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ९.२० वाजण्याच्या सुमारास चऱ्होली बुद्रुक येथील दाभाडे सरकार चौकातील अलंकार सोसायटीमधील फ्लॅटमध्ये घडली. फिर्यादी त्यांच्या घरी असताना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एका क्रमांकावरुन एक संदेश आला. त्या संदेशातील लिंकवर क्लिक करुन त्यांनी सहमती दिल्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये एक अॅप डाउनलोड झाले.

त्या अॅपच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचा मोबाईल हॅक करुन त्यावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर फिर्यादीच्या मोबाईलमधील वन कार्ड, क्रेडिट कार्ड अॅप्लिकेशनचा वापर करुन आरोपीने त्यांच्या परवानगीशिवाय एकूण ६ लाख ४१ हजार रुपये काढले. 

या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून दिघी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२), ३३६(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान (सुधारित) अधिनियम २००८ अंतर्गत कलम ६६(सी) आणि ६६(डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रहाणे करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories