तरुणाईने छत्रपती शिवरायांच्या आदर्शांचे आचरण करावे - डॉ. प्रमोद बोराडे
Feb 16 2026
72
तरुणाईने छत्रपती शिवरायांच्या आदर्शांचे आचरण करावे - डॉ. प्रमोद बोराडे
पिंपरी, ता. १६ - "छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शाचे व संस्कारांचे आचरण केल्यास जीवन सुंदर व आदर्शवत होईल," असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक व्याख्याते डॉ. प्रमोद बोराडे यांनी केले.
वडगाव मावळ येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री रमेशकुमार साहनी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष राजेंद्र म्हाळसकर, उपाध्यक्ष सचिन ढोरे, सचिव राजेंद्र वहिले, लायन्स क्लब ऑफ तळेगावचे अध्यक्ष राजेंद्र झोरे, मुख्याध्यापिका मीना अय्यर, व्यवस्थापक आदिनाथ आगळमे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
बोराडे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली तसेच मावळ तालुक्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.