news
clock
शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला 'पीएमपी'च्या बस मार्गांत दुपारनंतर बदल

शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला 'पीएमपी'च्या बस मार्गांत दुपारनंतर बदल

शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला 'पीएमपी'च्या बस मार्गांत दुपारनंतर बदल 

पिंपरी, ता. १७ - शिवजयंतीनिमित्त गुरुवारी (ता. १९) भवानी पेठेतील भवानीमाता मंदिर येथून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक दुपारी ४ वाजता निघणार आहे. त्यासाठी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते बस व अन्य वाहतुकीसाठी दुपारी ४ वाजता बंद केले जाणार आहेत, तेव्हा 'पीएमपीएमएल'च्या बसेसही पर्यायी मार्गांनी जातील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी व पीएमपी व्यवस्थापनास सहकार्य करावे, असे आवाहन 'पीएमपीएमल'च्या वाहतूक व्यवस्थापकांनी केले आहे.

याबाबत, 'पीएमपीएमएल'ने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे की, शिवजयंतीनिमित्त गुरुवारी (ता. १९) भवानी पेठेतील भवानीमाता मंदिर येथून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक दुपारी ४ वाजता निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी (सिव्हील कोर्टाजवळ) मिरवणुकीची सांगता होणार आहे. मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात व नागरीकांच्या सोयीसाठी  वाहतूक पोलीसांकडून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते बस व अन्य वाहतुकीसाठी दुपारी ४ वाजता बंद केले जाणार आहेत, तेव्हा 'पीएमपीएमएल'च्या बसेसही पर्यायी मार्गांनी जातील. तसेच, ऐनवेळी वाहतूक पोलीस विभागाकडून वाहतूकीमध्ये बदल केल्यास त्याप्रमाणे बस संचलन सुरु राहील, याची प्रवाशी नागरिकांनी नोंद घ्यावी व पुणे महानगर परिवहन महामंडळास सहकार्य करावे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories