संत तुकाराम महाराज बीज उत्सवासाठी देहूगाव परिसरात ४ ते ६ मार्चपर्यंत वाहतुकीत बदल

पिंपरी, ता. २६ - देहूगावमध्ये ५ मार्चला संत तुकाराम महाराज बीज उत्सव साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी देहूमध्ये राज्यभरातून वारकरी, भाविक येणार आहेत. त्यामुळे देहूगाव परिसरात वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे देहूरोड, चिखली, महाळुंगे, वाहतुक विभागांतर्गत देहूरोड व परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. हे वाहतूक बदल  ४ मार्च दुपारपासून ते ६ मार्चला रात्री बारा वाजेपर्यंत लागू असतील. त्यानंतरही वाहतूक सुरळीत होईपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुकीतील बदल लागूच असतील. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून वगळले आहे. या बदलाबाबतचे आदेश पिपंरी-चिंचवड शहर, वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी जारी केले आहेत. 

नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने केले आहे. 

देहूरोड, चिखली, महाळुंगे, वाहतुक विभाग अंतर्गत केलेले बदल -

१. देहूगाव कमान (जुना मुंबई-पुणे हायवे) येथुन देहूगावकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे. (सार्वजनिक वाहतुक बसेस व दिंडीतील वाहने वगळून) 

पर्यायी रस्ता - वाहने भक्ती-शक्ती चौक त्रिवेणीनगर चौकमार्गे इच्छितस्थळी जातील. 

२. महिंद्रा सर्कलकडून फिजुत्सु कॉर्नर अथवा कॅनबे चौक /आयटी पार्क चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे. (सार्वजनिक वाहतुक बसेस व दिंडीतील वाहने वगळून)

पर्यायी रस्ता - महिंद्रा सर्कल निघोजे मोईफाटा मार्गे डायमंड चौकाकडुन इच्छित स्थळी जातील.

३. तळेगाव-चाकण रोडवरील देहुफाटा येथुन देहूगाव जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे. (सार्वजनिक वाहतुक बसेस व दिंडीतील वाहने वगळून)

पर्यायी रस्ता - सदर मार्गावरील वाहने एच.पी. चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

४. आयटी पार्क/कॅणबे चौकाकडुन काळोखे पाटील चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे. (सार्वजनिक वाहतुक बसेस व दिंडीतील वाहने वगळून)

पर्यायी रस्ता - कॅनबे चौकाकडुन महिंद्रा सर्कल - एचपी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

५. त्रिवेणीनगर चौक निगडी कडुन तळवडे चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे. (सार्वजनिक वाहतुक बसेस व दिंडीतील वाहने वगळून)

पर्यायी रस्ता - त्रिवेणीनगर कडुन सविधान चौक कृष्णानगर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

६. डायमंड चौकाकडुन देहूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे. (सार्वजनिक वाहतुक बसेस व दिंडीतील वाहने वगळून)

पर्यायी रस्ता - सदर मार्गावरील वाहने डायमंड चौकाकडुन कुदळवाडी सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.

७. देहू कमान-१४ टाळकरी कमान इंद्रायणी पुल- हॉटेल

कॉर्नर मार्गावरुन जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.

पर्यायी रस्ता -  स्थानिक रहिवासी देहुगावातील अंतर्गत रस्त्याचा वापर करतील.

८. टाळकरी कमान भैरवनाथ चौक दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे.

९. काळोखे पाटील चौक ते देहु मुख्य कमान ते परंडवाल चौक हा रस्ता सर्व प्रकारचे वाहनांसाठी बंद करण्यात येत आहे.

१०. जुना पालखी मार्ग (कंद पाटील चौक) ते झेंडेमळा (जकातनाका) जाणारी सर्व वाहतुक वन-वे (एक दिशा मार्ग) करण्यांत यावी. झेंडे मळयाकडुन कंद पाटील चौकाकडे प्रवेश बंद करण्यात येत आह

पार्किंग व्यवस्था पुढीलप्रमाणे ............

१. आळंदी तळवडेकडून येणाऱ्या वाहनांसाठी माऊली वजन काटा, काळोखे पाटील चौक (खंडेलवाल चौक) येथे पार्किंग तसेच सदर ठिकाणी पीएमपीएल बस पार्किंग करण्यात येत आहे.

२. आळंदी तळवडेकडून येणाऱ्या वाहनांसाठी गायरान पार्किंग तसेच सदर ठिकाणी पीएमपीएल बस पार्किंग करण्यात येत आहे.

३. जुना पुणे- मुबंई महामार्ग देहू कमान येथून येणाऱ्या वाहनांसाठी राधाकृष्ण लॉन्स शेजारील सीओडीच्या जागेत वाहनांचे पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. तसेच सदर ठिकाणी पीएमपीएल बस पार्किंग करण्यात येत आहे.

४. चाकण - तळेगाव रोडवरील देहू फाटा येथून येणाऱ्या वाहनांसाठी सप्तपदी लॉन्स, येलवडी शॉपिंग कॉम्प्लेक्स, दिगंबरा डेव्हलपर्स व भगिरथी लॉन्स येथे वाहनांकरिता पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. तसेच साईराज चौक ते देहुफाटा या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुस असलेल्या हॉटेल शॉपिंग कॉम्पलेक्स यांच्या जागेत वाहने पार्क करतील.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance