news
clock
वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा

वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा

वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा 

पिंपरी, ता. २५  - वेश्याव्यवसायाच्या  उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेवर मंगळवारी (ता. २४) दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २४) सायंकाळी दिघी येथील योगीराज चौकाकडून चाकण चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ४३ वर्षीय महिला वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार करत होती, डोळयाने खुणावून व हाताने लैंगिक हावभाव करुन सार्वजनिक ठिकाणी येणा-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करत होती. तिच्या या गैरवर्तनामुळे सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग होत होता. 

या प्रकरणी सदर महिलेविरोधात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories