उघड्यावर प्लॅस्टिक कचरा जाळणाऱ्या दुकानदारावर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची दंडात्मक कारवाई

उघड्यावर प्लॅस्टिक कचरा जाळणाऱ्या दुकानदारावर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची दंडात्मक कारवाई

उघड्यावर प्लॅस्टिक कचरा जाळणाऱ्या दुकानदारावर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची दंडात्मक कारवाई 

पिंपरी, ता. २५ - सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर प्लॅस्टिक कचरा जाळून प्रदूषण करणाऱ्या एका दुकानदारास तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने दोन हजार रुपये दंड करून प्रतिबंधात्मक कारवाई केली.

बुधवारी (ता. २५) सकाळी जिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन रस्त्यावर बीएसएनएल कार्यालयासमोरील  रस्त्यावरील पदपथालगत असलेल्या अशोकाच्या झाडाच्या बुंध्यापाशी एक दुकानदाराने प्लॅस्टिक कचरा जळताना आढळून आला. ही बाब नगरपरिषद प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर स्टेशन विभागाचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय ढवळे, मुकादम राहुल आगळे, साजिद शेख, शुभम हेंद्रे आणि आदेश जाधव यांनी संबंधित ठिकाणी जाऊन चौकशीअंती दोषी ठरलेल्या दुकानदारास दोन हजार रुपयांचा दंड केला. प्रतिबंधात्मक कारवाई केली. यापुढे कचरा न जाळण्याबाबत दुकानदारास ताकीद दिली. 

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत उघड्यावर कचरा फेकणारे, कचरा जाळणारे यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी गिरीश दापकेकर आणि नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories