भोसेमध्ये जुन्या भांडणाचा राग मनात धरून कुटुंबीयांवर हल्ला!

भोसेमध्ये जुन्या भांडणाचा राग मनात धरून कुटुंबीयांवर हल्ला!

भोसे | 16 सप्टेंबर 2026 : जुन्या भांडणाचा राग मनात धरून 26 वर्षीय तरुणासह त्याच्या आई-वडील आणि मावशीला शिवीगाळ करत लाकडी दांडा, वीट तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केल्याची घटना भोसे येथील साई पार्क, पठारे वस्ती परिसरात घडली. याप्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 14 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास साई पार्क, पठारे वस्ती, भोसे, ता. खेड, जि. पुणे येथे घडली.

या प्रकरणी सचिन ज्ञानोबा बालटकर (वय 26, रा. गट नंबर 723, साई पार्क, पठारे वस्ती, भोसे, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. 

आरोपी महेश महादेव कुसाळकर, महादेव सूर्यभान कुसाळकर आणि एक महिला सर्व रा. साई पार्क, पठारे वस्ती, भोसे, ता. खेड, जि. पुणे अशी आहेत.

फिर्यादीच्या घरासमोरील रस्त्यावर आरोपी क्रमांक एक आणि दोन यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून संगनमत केल्याचा आरोप आहे. त्यानंतर फिर्यादी सचिन बालटकर, त्यांची आई, वडील ज्ञानोबा बालटकर आणि मावशी यांना शिवीगाळ करण्यात आली.

त्यानंतर लाकडी दांडा, वीट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चौघांना दुखापत केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2), 118(1), 352 आणि 351(2)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास उत्तर चाकण पोलीस करत आहेत. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories