परिवहन वाहनांसाठी 'फॅन्सी नंबर'साठी नवी सिरीज सुरु, अर्ज करण्याचे आरटीओ कार्यालयाचे आवाहन
Feb 19 2026
68
परिवहन वाहनांसाठी 'फॅन्सी नंबर'साठी नवी सिरीज सुरु, अर्ज करण्याचे आरटीओ कार्यालयाचे आवाहन
पिंपरी, ता. १९ - पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) परिवहन वाहनांसाठी आकर्षक नंबरसाठी नवीन मालिका सुरु केली जात आहे. आपल्या पसंतीचे आकर्षक नोंदणी क्रमांक मिळवण्यासाठी नागरिकांना तीनपट शुल्क भरुन आगाऊ अर्ज करायचे आहेत, अशी माहिती आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
चारचाकी वाहनांसाठी २३ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. एकाच नंबरासाठी अनेक अर्ज आल्यास २४ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता लिलाव होईल.
अर्जासोबत डीडी, पॅन कार्डची साक्षांकित प्रत, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा जोडणे बंधनकारक आहे. लिलावासाठी एकच डीडी असलेले सीलबंद पाकीट सादर करावे. समान रकमेच्या डीडी आल्यास चिठ्ठया टाकून निर्णय होईल. आरक्षित नंबरची वैधता १८० दिवसांची आहे, असे आरटीओ कार्यालयाने सांगितले आहे.